भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते ‘मिल्ट्री स्टाईल’मध्ये; ‘AI’ ने बनवलेले फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले…

मुंबई – सध्या जगात “आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. आर्टिफिशियल इन्टेलिजन्सचा वापर केवळ अमेरिका आणि पाश्‍चात्य देशांमध्येच नव्हे, तर आपल्याही देशात आता वाढत आहे. हा आजच्या या डिजिटल युगातला सर्वात मोठा बदल आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्स मुळे बऱ्याच गोष्टी ऍडव्हान्स झाल्याचे आपण पाहतो.

भविष्यामध्ये येणारे शतक फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाईल. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापर करून भविष्यामध्ये प्रत्येक क्षेत्र हे विकसित होऊ शकते. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार केलेले अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील.

आता यामध्ये महाराष्ट्राच्या भाजप नेत्यांच्या एआय फोटोंची भर पडली आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत असून, नेटकरी देखील यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. आधी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचे फोटो तयार करण्यात आले असून,

आता भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांची देखील यामध्ये भर पडल्याचं दिसत आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील , नारायण राणे, उदयनराजे भोसले, पंकजा मुंडे, चित्रा वाघ, नितीन गडकरी इत्यादी प्रमुख नेत्यांचे हे फोटो तयार करण्यात आले असून, त्यांचा मिल्ट्री स्टाईल अंदाज यात दिसत आहे.