IPL 2024 : पंजाबचा स्टार गोलंदाज रबाडा मायदेशी परतला, समोर आलं ‘हे’ कारण….

Kagiso Rabada leaves IPL 2024 : – राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी पंजाब किंग्जला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा त्याच्या पायाच्या दुखापतीमुळे आपला आयपीएल संघ सोडून मायदेशी परतला आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने बुधवारी ही माहिती दिली.

रबाडा आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचे प्रतिनिधित्व करतो. चालू मोसमात त्याने 11 सामन्यांत 11 बळी घेतले आहेत. पंजाबचा संघ आधीच प्ले-ऑफसाठी पात्र होण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे आणि 19 मे रोजी शेवटचा साखळी सामना खेळणार आहे.

IPL 2024 (SRH vs GT Match 66) : हैदराबाद प्लेऑफपासून फक्त एक विजय दूर, आज गुजरात टायटन्स विरूध्द रंगणार लढत…

क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने (सीएसए) एका निवेदनात म्हटले आहे की, 28 वर्षीय रबाडा दक्षिण आफ्रिकेत आल्यावर क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या वैद्यकीय संघाकडून त्याचे बारकाईने निरीक्षण केले जात आहे. त्यामुळे, दुखापतीमुळे पुढील महिन्यात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीवर परिणाम होण्याची शक्यता नाही. दक्षिण आफ्रिका 3 जूनला न्यूयॉर्कमध्ये श्रीलंकेविरुद्ध विश्वकरंडक मोहिमेला सुरुवात करणार आहे.