कंगनाचा आता सोनिया गांधींवर निशाणा, म्हणाली…..

नवी दिल्ली – कंगना राणावत आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात गेल्या काही दिवसापासून वाद-विवाद सुरू आहे. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने नियमांचे उल्लंघन केल्याचे कारण देत मुंबईतील कंगणाचे कार्यालय पाडले तेव्हा हा वाद आणखी वाढला.

त्यानंतर आता कंगनाने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. कंगणाने म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा आदर राखून घटनेच्या तत्त्वांचे पालन करा, असा आदेश तुम्ही तुमचा सहभाग असलेल्या महराष्ट्रातील सरकारला देऊ शकत नाही का,?

कंगनाने शुक्रवारी ट्विट करताना म्हटलं आहे की, कॉंग्रेसच्या माननीय अध्यक्षा सोनिया गांधी तुम्ही एक महिला म्हणून, आपला सहभाग असलेल्या सरकारकडून एका महिलेची छळवणूक सुरू असताना  गप्प का? ‘त्याबद्दल तुम्हाला संताप आला नाही का?  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा आदर राखून घटनेच्या तत्त्वांचे पालन करा, असा आदेश तुम्ही तुमच्या सरकारला देऊ शकत नाही का,?

पुढे कंगनाने लिहिले की, ‘तुम्ही पश्चिमी देशात वाढलात आणि भारतातच राहता. महिलांच्या संघर्षाची जाणीव तुम्हाला असेलच. महाराष्ट्रात सरकार एका महिलेची छळवणूक करीत असताना आणि कायदा व सुव्यवस्थेची थट्टा सुरू असताना तुमच्या गप्प राहण्याची इतिहास नोंद घेईल.  मला आशा आहे की तुम्ही यात हस्तक्षेप कराल. ‘

Leave a Comment