करोना निगेटिव्ह येताच करीनाचा पार्टी मूड ऑन… !

मुंबई – करोनाचे नियम गर्दीमध्ये चिरडल्यामुळे काही बॉलिवूड सेलिब्रिटी चांगलेच अडचणीत सापडले आहे. काही दिवसांपूर्वी  मुंबईतील प्रसिद्ध ग्रँड हयात हॉटेलमध्ये एक शानदार पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी बॉलिवूडचे अनेक बडे सेलिब्रिटी कॅनेडियन रॅपर ‘एबी ढिल्लोन’च्या गाण्यावर थिरकत होती.

 

याच पार्टीमध्ये  बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर आणि तिची जवळची मैत्रिण अमृता अरोरा या दोघींना कोरोनाची लागण झाली होती. आता मात्र  करीना आणि अमृताची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

करोना चाचणी  निगेटिव्ह येताच करीनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून अमृता सोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोत करीना आणि अमृता ग्लॅमरस दिसत आहे. हा फोटो शेअर करत आम्ही परत आलो आहोत. फ्राय डे पार्टीच्या मूडमध्ये करीना आणि तिची गल्स गॅंग दिसून आली. करोनातून बाहेर आल्यानंतर करीनाने पुन्हा एकदा पार्टी करायला सुरुवात केली आहे.

दरम्यान, करीना लवकरच ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात करीना दिसणार आहे. या चित्रपटात करीनासोबत आमिर खान मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.