KBC: IPS ऑफिसर मोहिता शर्मा बनल्या ‘करोडपती’; दिलं ‘या’ 1 कोटीच्या प्रश्नाचं उत्तर

नवी दिल्ली – कौन बनेगा करोडपतीच्या दुसऱ्या शोमध्ये 17 नोव्हेंबर रोजी आयपीएस अधिकारी मोहिता शर्मा करोडपती बनल्या आहेत.

मोहता शर्मा

मोहिता यांना एक कोटीचा प्रश्न विचारण्यात आला –

यातील कोणत्या स्फोटकाचे प्रथम जर्मन रसायनशास्त्रज्ञ जॉर्ज फेड्रिक हेनिंग यांनी 1898 मध्ये पेटंट केले होते आणि दुसर्‍या महायुद्धात प्रथम वापरण्यात आले होते.

या प्रश्नाचे बरोबर उत्तर होते ‘आरडीएक्स’ होते.

मोहता शर्मा

मोहिता यांनी एक्स्पर्ट लाईफलाईनच्या मदतीने अचूक उत्तर दिले आणि त्या 2020 च्या दुसऱ्या करोडपती ठरल्या.

मोहता शर्मा

मोहिता शर्मा कोण आहे?
मोहिता या 2017 बॅचच्या आयपीएस अधिकारी असून सध्या त्या जम्मू-काश्मीरमध्ये तैनात आहेत. त्यांनी भारतीय वन सेवेतील अधिकारी रुशाल गर्ग यांच्याशी लग्न केले. मोहिता या मूळच्या हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील आहेत. नंतर त्याचे कुटुंब दिल्लीला स्थलांतरीत झाले. त्याचे वडील मारुती कंपनीत काम करायचे आणि आई गृहिणी आहेत. मोहिता यांचे सासर चंदीगडमध्ये आहे.

मोहता शर्मा

अलीकडेच त्यांच्या नेतृत्वात पोलिसांनी मोठी कारवाई केली आणि बरीच गोदामे सील केली. या गोदामांमध्ये गुप्तपणे सरकारी वस्तूंची विक्री केली जात होती.

शोमध्ये त्यांनी प्रत्येक गोष्टीचे श्रेय पती राहुल गर्ग यांना दिले. त्यांनी सांगितले की त्यांचे पती गेल्या 20 वर्षांपासून केबीसीत येण्याचा प्रयत्न करीत आहे.

मोहता शर्मा

राहुल गर्ग यांनी सांगितले की त्यांनी कौन बनेगा करोडपती ज्युनियरमध्ये प्रथमच केबीसीसाठी प्रयत्न केला होता. ते त्यावेळी पाचवीत होते.

मोहता शर्मा

गेल्या आठवड्यात दिल्लीहून आलेल्या मॅनेजर नाझिया नाझ यांनी एक करोड रूपये जिंकले होते. मात्र, सात कोटीच्या प्रश्नाचे योग्य उत्तर देता न आल्याने त्यांनी खेळ सोडला होता.

Leave a Comment