‘या’ राज्यातील सरकारी कार्यालयांना मिळणार “ग्रीन’ टॅग

थिरूवनंतपुरम – केरळ मध्ये सर्व सरकारी कार्यालये पर्यावरणपुरक करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या कार्यालयांना लवकरच ग्रीन टॅग मिळणार आहे.

सरकारी कार्यालयांमध्ये प्लॅस्टिकचा वापर पुर्णपणे रोखला जाणार असून तेथे रिसायकल करता येतील अशाच वस्तुंचा वापर होणार आहे.

अशा पर्यावरणपुरक उपाययोजना करणाऱ्या कार्यालयांना ग्रीन सर्टिफिकेट दिले जाणार असून हा कार्यक्रम येत्या 26 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

केरळ सरकारने सर्व राज्यच पर्यावरणपुरक करण्याचा निर्णय घेतला असून पाणी व मातीचे प्रदुषण रोखण्यासाठीच्या अनेक उपाययोजना राज्यभर हाती घेतल्या जाणार असून त्यासाठी हरिथ केरलाम मिशन हाती घेण्यात येणार आहे.

पर्यावरण व प्रदुषण रोखण्याच्या संबंधात जनजागृती करण्यासाठी ग्रीन प्रोटोकॉल समित्याही स्थापन केल्या जाणार आहेत.

Leave a Comment