राज्य संघांची निवड चाचणी जानेवारीत

पुणे – दुसऱ्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा आणि वरिष्ठ व कुमार गटासाठीच्या स्की अँड स्नोबोर्ड अजिंक्‍यपद स्पर्धा यासाठी निवड चाचणी व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन स्की अँड स्नोबोर्ड संघटना(महाराष्ट्र) यांच्या वतीने नव्या वर्षात 24 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात येणार आहे. 

यासाठीची पात्रता स्पर्धा व पहिली राज्यस्तरीय अजिंक्‍यपद स्पर्धा 1 फेब्रुवारीपासून आयोजित करण्यात आली आहे. स्की अँड स्नोबोर्ड संघटनेचे अध्यक्ष आनंद लाहोटी आणि सचिव साबीर शेख यांनी ही माहिती दिली.

वरिष्ठ गटाच्या स्पर्धेसाठी अल्पाइन स्लॅलोम व जायंट स्लॅलोम (पुरुष व महिला), स्नोबोर्डिंग स्लॅलोम व जायंट स्लॅलोम (पुरुष व महिला), क्रॉसकंट्री पुरुष 15 किमी व महिला 10 किमी, स्प्रिंट 1.5 किमी (पुरुष व महिला) या गटांचा तर, कुमार गटाच्या स्पर्धेसाठी अल्पाइन स्लॅलोम व जायंट स्लॅलोम (14,16,18 आणि 21 वर्षांखालील मुले व मुली), स्नोबोर्डिंग स्लॅलोम व जायंट स्लॅलोम (18, 21 वर्षांखालील मुले व मुली) या गटांचा समावेश आहे.

वरीष्ठ गटात प्रत्येक संघात 5 पुरुष, 5 महिलांचा समावेश, तर कुमार गटात 3 मुले व 3 मुलींचा समावेश असतो.

 

Leave a Comment