Green Electric Vehicle : कायनेटिक ग्रीन इलेक्‍ट्रिक वाहन उत्पादन क्षमता वाढविणार

मुंबई – केंद्र सरकार आणि राज्य सरकार इलेक्‍ट्रिक वाहन निर्मितीसाठी चालना देत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम जाणवत आहे. इलेक्‍ट्रिक वाहनांना चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे आम्ही उत्पादन क्षमता वाढविणार असल्याचे कायनेटिक ग्रीन या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुलज्जा फिरोदिया मोटवानी यांनी सांगितले.

आम्हाला इलेक्‍ट्रिक दुचाकी विक्रीतून 600 कोटी महसुलाची अपेक्षा आहे. वितरकांनी 5,000 वाहनांची ऑर्डर दिली आहे. त्यामुळे आम्हाला उत्पादन क्षमता वाढवावी लागणार आहे. या अगोदरच कंपनीने तीन इलेक्‍ट्रिक दुचाकी सादर केल्या आहेत. आणखी तीन दुचाकी सादर करण्याची तयारी सुरू आहे. त्यामध्ये इलेक्‍ट्रिक लुनाचा समावेश असेल असे त्यांनी सांगितले.

कायनेटीक ग्रीन कंपनीने चीनमधील आयमा टेक्‍नॉलॉजी समूहासोबत तंत्रज्ञानासंदर्भात सहकार्य करार केला आहे. कंपनीने अगोदरच 40 हजार वाहने विकली आहेत.

महिन्याला साधारणपणे चार ते पाच हजार वाहनांची विक्री होते. मागणी वाढल्यामुळे आम्हाला महिन्याला साधारणपणे 10 हजार वाहनांची निर्मिती करावी लागणार असल्याचे त्या म्हणाल्या.