मैं कोल्हापुर से आई हूँ… ‘प्राजक्त’चा अस्सल कोल्हापुरी साज-श्रृंगार

मुंबई –  नितळ त्वचा, नशिले डोळे, कमनीय बांधा अशी सौंदर्याची खाण असलेल्या अभिनेत्री ‘प्राजक्ता माळी’ने फॅन्सच्या हृदयात आपली एक खास जागा निर्माण केली आहे. प्राजक्ता सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे.

आपल्या लक्षवेधी स्टाईल मुळे प्राजक्ता प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. नुकतंच प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कोल्हापुरी साजश्रृंगारातील फोटो शेअर केले आहेत. कोणालाही घायाळ करेल असा तिचा कोल्हापुरी साज सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

खणाची साडी, केसांचा अंबाडा, त्यात माळलेला गजरा, गळ्यात कोल्हापुरी साज, नाकात नाथ आणि कपाळी चंद्र कोर असा प्राजक्ताने साजश्रृंगार केला आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला असून, अनेक फॅन्स तिच्या प्रेमात पडले आहेत.

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताने आपल्या अभिनयाची मोहिनी दोन्हीकडे घातली. कधी कधी  प्राजक्ता सोशल मीडियावर बोल्ड फोटोशूट पोस्ट करताना सुद्धा दिसत असते.

Leave a Comment