लालू प्रसाद यादव यांच्या लेकीची राजकारणात एन्ट्री; ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा

पाटणा – राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्या बिहारच्या सारण मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवू शकते. लालू यादव यांची तीन मुले मीसा भारती, तेजस्वी आणि तेज प्रताप यादव हे आधीच राजकारणात सक्रिय आहेत.

तेजस्वी यादव हे बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. त्यांची इतर दोन भावंडे, तेज प्रताप यादव आणि मिसा भारती, अनुक्रमे बिहार विधानसभेचे आणि राज्यसभेचे सदस्य आहेत. आता रोहिणीही राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

यादव कुटुंबाच्या जवळचे मानले जाणारे बिहार विधान परिषदेचे सदस्य सुनील कुमार सिंह यांच्या सोशल मीडिया पोस्टनंतर आचार्य यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या अटकळांना वेग आला आहे. काल सुनील कुमार सिंह यांनी लिहिले होते की, रोहिणी आचार्य ही तिच्या वडिलांप्रती प्रेम, भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक आहे. त्यांना सारणमधून लोकसभेचे उमेदवार करावे, अशी सारण प्रदेशातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. Rohini Acharya joins politics|

या महिन्याच्या सुरुवातीला पाटणा येथील गांधी मैदानावर आरजेडीच्या रॅलीतही आचार्य उपस्थित होते. सारण लोकसभा मतदारसंघ सध्या भाजपकडे असून राजीव प्रताप यांनी येथून निवडणूक जिंकली होती. यापूर्वी लालू प्रसाद यादव यांनी प्रतिनिधित्व केले आहे.

कोण आहेत रोहिणी आचार्य ?  Rohini Acharya joins politics| 

आपल्या वडिलांच्या दुर्धर आजारामध्ये रोहिणीनेच आपली एक किडनी वडिलांसाठी दान केली आहे.  यामुळे त्या अधिक चर्चेत आल्या होत्या. रोहिणी आचार्य शिक्षा यांनी एमबीबीएस पदवी घेतली आहे. 2002 मध्ये, त्यांनी लालू यादव यांचे मित्र राय रणविजय सिंह यांचा मुलगा समरेश सिंह यांच्याशी विवाह केला. तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. आचार्य आणि त्यांचे पती गेल्या दोन दशकांपासून सिंगापूर आणि अमेरिकेत राहतात. या जोडप्याला दोन मुले आहेत.

हेही वाचा: 

‘शक्तिमान’च्या भूमिकेसाठी रणवीर सिंगला घेण्यावरून मुकेश खन्ना संतापले; म्हणाले…