“मातोश्रींच्या निधनानंतर त्यांनी डोक्यावरचे केस काढायला हवे होते.. पण ते खरे हिंदू नाहीत” बड्या नेत्याची पंतप्रधानांवर टीका, भाजप म्हणते..

Lalu yadav on PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी कायम विरोधकांवर परिवारवाद म्हणजेच घराणेशाहीचा आरोप करीत आले आहेत. त्याला काल लालूप्रसाद यादव यांनी पाटण्याच्या रॅलीत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे मेादींना परिवार नाही त्याला आम्ही काय करू शकतो असा सवाल त्यांनी मोदींना उद्देशून विचारला नाही. | Lalu yadav on PM Modi

मोदी केवळ तोंड देखलेपणाने हिंदुत्वाचा पुरस्कार करीत असले तरी ते खरे हिंदुही नाहीत असेही लालूंनी म्हटले आहे. आपल्या मातोश्रींच्या निधनानंतर त्यांनी डोक्यावरचे केस काढून टाकणे अपेक्षित होते. दाढी मिशाही त्यांनी काढायला हव्या होत्या. पण ते खरे हिंदु नसल्याने त्यांनी यातले काही केले नाही असे लालू म्हणाले.| Lalu yadav on PM Modi

त्यांच्या या विधानावर भाजपने संतप्त प्रतिक्रीया दिली आहे. भाजपने म्हटले आहे की त्यांचे हे वक्तव्य अवमान जनक आहेत. मोदींवर करण्यात आलेला हा व्यक्तीगत हल्ला आहे असे भाजपने म्हटले आहे. | Lalu yadav on PM Modi

भाजपचे बिहारचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा म्हणाले की लालूप्रसाद यादव हे सनातन धर्माच्या विरोधात आहेत; म्हणूनच त्यांना असे वक्तव्य केले आहे.ते राजकीय जोकर असल्यासारखे वक्तव्य करीत आहेत, त्यांना रोखण्याची गरज आहे. आपल्या पंतप्रधानांनी सनातन धर्मासाठी काय केले आहे ते सर्वांना माहिती आहे असेही सिन्हा यांनी म्हटले आहे.