ऍपलचा सर्वात स्वस्त स्मार्टफोनचे 15 एप्रिलला ऑनलाईन लॉंच

नवी दिल्ली – जगातील दिग्गज आयफोन निर्मिती करणारी ऍपल कंपनी लवकरच एक स्वस्त किंमतीचा स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. आयफोन9 हे मॉडेल येत्या 15 एप्रिल 2020 रोजी सादर करणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. करोनाच्या विळख्यात कंपनीने सादरीकरणाचा कार्यक्रम न लांबविता तो नियोजित वेळेत करण्यासाठी या स्मार्टफोनचे सादरीकरण ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तर 22 एप्रिलनंतर यांची विक्री सुरु होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

आयफोन 9 या मॉडेलसोबत कंपनी 5.5 इंच डिस्प्ले असणारा आयफोन9 प्लसचेही सादरीकरण करण्याच्या तयारीत आहे. या स्मार्टफोनचे नाव आयफोन एसइ 2 असणार आहे. ऍपलच्या माहितीनुसार हा स्मार्टफोन सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारा असणार आहे. हा सर्वात स्वस्त आयफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

ऍपलच्या या नवीन स्मार्टफोनची किमत 399 डॉलर म्हणजे जवळपास 29 हजार रुपये असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. फोनमध्ये 64 जीबी, 128 जीबी व 256 जीबीचे स्टोरेज मिळणार असल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment