निरोगी आरोग्यसाठी जाणून घ्या आयुर्वेदाचे महत्व

आपण आपल्या कुटुंबासाठी, स्वत:साठी आयुष्याचे नियोजन करतो. यासाठी विमा पॉलिसी, पेन्शन प्लॅन आदीमध्ये पैसे गुंतवतो आणि आपल्या भविष्याची काळजी घेतो. मग आपले शरीर निरोगी राहावे, यासाठी आरोग्यासाठीची गुंतवणूक महत्वाची आहे.  ( ayurvedic remedies )

 काय काळजी घेतली तर आरोग्य चांगले राहील हे समजून घेतले पाहिजे. प्रत्येक व्यक्तींनी आरोग्य संपन्न स्थितीत 100 वर्षे जगावे. हे आयुर्वेदशास्त्राला अपेक्षित आहे. आयुर्वेदशास्त्राचे प्रयोजनच मुळी स्वस्थस्य स्वास्थ रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च! हे आहे. अर्थात निरोगी व्यक्तीच्या आरोग्याचे संरक्षण करणे आणि एवढे करूनही जर रोग झालाच तर त्यावर उपचार करणे हे आयुर्वेदाचे प्रयोजन आहे. यामध्ये निरोगी व्यक्तीचे आरोग्य टिकवून ठेवण्यास सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे. रोगावर उपचार करणे ही दुय्यम बाब आहे. 

आयुर्वेदात हजारो वर्षापूर्वी सर्वसामान्य व्यक्ती आजारी पडू नये म्हणून आयुर्वेदाची सामाजिक आरोग्याची संकल्पना निश्‍चितच आजही उपयोगी आहे. यामुळेच यावर्षीचे घोषवाक्‍य हे आयुर्वेदा इन पब्लिक हेल्थ हे असावे. या दिनाच्या निमित्ताने संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रमाद्वारे आयुर्वेदाच्या माध्यमातून तन मन जन सुखी व्हावे याबाबत जनजागृती केली जाणार आहे.
चरकसंहिता हा आयुर्वेद शास्त्रातील महत्वाचा ग्रंथ आहे.  ( ayurvedic remedies )

या संहितेचा प्रारंभच मुळी दीर्घन्जीवितीय (दीर्घकाळ जगण्यासाठी करावयाच्या बाबीचे वर्णन ) या अध्यायापासून झालेला आहे. यावरून आरोग्य संपन्न दीर्घायुष्यावर आयुर्वेदाचा किती भर होता, हे स्पष्ट होते. आरोग्यासाठीची गुंतवणूक ही भावी आयुष्यासाठी अत्यंत आवश्‍यक आहे. आरोग्य म्हणजे काय? कुठलाही आजार नाही त्या व्यक्तीला निरोगी म्हणायचे का? असा प्रश्‍न समोर येणे स्वभाविकच आहे. याबाबत आयुर्वेदाने आरोग्याची पुढील व्याख्या केली आहे.

समदोष: समाग्नीश्‍च समधातु मालक्रिय:!
प्रसन्नत्भेन्द्रीय मन: स्वस्थ इत्यभिधियते!

अर्थात शरीराला धारण करणारे तीन दोष (वात, पित्त, कफ) सात धातू (रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र) तीन मल (मूत्र, स्वेद, पुरीष) आणि अग्नि, पचनशक्ती हे 14 घटक यांची कार्य प्राकृत असणे, इंद्रिये (ज्ञानेन्द्रीये, कर्मेंद्रिये) आणि त्याचबरोबर मन, आत्मा प्रसन्न असणे हे स्वस्थ अर्थात निरोगी माणसाचे लक्षण आयुर्वेदाने सांगितले आहे.   ( ayurvedic remedies )

मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हे संतवचन प्रसिद्ध आहे. कारण सध्या प्रचंड धावपळ, ताणतणाव यामुळे मानसिक विकारांचे प्रमाण वाढत आहे. इंग्रजीत याला डिसीज (डीस अट इज ) अर्थात स्वस्थता नाही अशी दोन शब्दाची व्याख्या केलेली आहे. आयुर्वेदात रोग होण्याची दोन प्रमुख कारणे सांगितली आहेत.

1) रोगा सर्वे पि मन्दग्नो – भूक न लागणे, अपचन त्यामुळे शरीराला आवश्‍यक असणारे घटकाचे शरीरात शोषण न होणे परिणामी अपचित घटकद्रव्ये शरीरात साठल्याने वेगवेगळ्या आजाराची निर्मिती होते.

2) रोगासर्वे पि जायन्ते वेगोदीरणधारणे :- प्राय: सर्व रोगाचे कारण हे मलमूत्र आदींचा वेग आल्यावर तो थांबवून धरणे हे आहे. शौचाला लागल्यावर किवा लघवी आल्यावर कामाच्या व्यापात ती अडवून ठेवणे हे प्राय: व्यवहारात घडते ते चुकीचे आहे. यामध्ये मल, मूत्र यासोबत शिंक, ढेकर, सर्दी, जांभई इ. चा समावेश आहे. याचे ही धारण करू नये. या दोन कारणांनी आजारावर अर्थात शरीरावर नियंत्रण राहू शकते.

आयुर्वेद हे एक प्राचीनतम भारतीय वैद्यकशास्त्र आहे. आयुर्वेदाने एका वर्षाचे सहा वेगवेगळ्या कालामध्ये विभाजन केले आहे. या सहा कालखंडालाच ऋतू असे म्हटले आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूमध्ये वातावरणातील होणाऱ्या बदलानुसार आपला दैनंदिन वेळापत्रकात थोडाफार बदल करावा लागतो. यालाच आयुर्वेदात ऋतुचर्या असे म्हटले आहे. प्रत्येक ऋतूत आढळणारे हवामान, आजूबाजूची परिस्थिती त्या कालावधीत शरीरात असणारी वात-पित्त-कफ या त्रिदोषांची स्थिती या सर्वांचा समग्र विचार करून शरीरासाठी हितकर आरोग्यदायी अशा बाबींचे सविस्तर मार्गदर्शन म्हणजे ऋतुचर्या. ( ayurvedic remedies )

डॉ. व्यंकट पु. धर्माधिकारी

Leave a Comment