“राज्यावरचे दुष्काळाचे संकट दूर होऊ दे”; मुख्यमंत्री शिंदेंची श्रीक्षेत्र भीमाशंकरचरणी प्रार्थना

मंचर – श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे चौथ्या श्रावणी सोमवारनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री भीमाशंकराचे दर्शनासाठीघेतले. यावेळी राज्यात भरपूर पाऊस पडू दे आणि शेतकऱ्यावर आलेले दुष्काळाचे संकट दूर होऊ दे, तसेच महाराष्ट्र राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे अशू प्रार्थना त्यांनी भीमाशंकरबाबाकडे केली.

यावेळी ते म्हणाले की श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे लाखो भाविक श्रावणात दर्शनासाठी येत असतात. राज्य सरकारच्या माध्यमातून या परिसरातील विविध विकासकामे मार्गी लागली असून अजूनही विकासकामे मार्गी लागणार आहेत.

यावेळी त्यांच्याबरोबर खासदार श्रीकांत शिंदे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनील बानखेले, रवींद्र करंजखेले, युवा सेनेचे सचिन बांगर यांसह विविध कार्यकर्ते उपस्थित होते.