पिंपरी-चिंचवड | लेवा पाटीदारच्‍या स्नेहसंमेलन गुणवंतांचा सन्‍मान

तळेगाव स्टेशन, (वार्ताहर) – तपोधाम कॉलनी, तळेगाव स्‍टेशन येथे लोहपुरुष लेवा पाटीदार मंडळाचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. माजी नगराध्यक्ष कृष्णा कारके यांच्या अध्यक्षतेखाली याचे आयोजन करण्यात आले होते. { meritorious }

या वेळी १० गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात सारिका शेळके, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, उद्योजक चंद्रकांत सावंत, डॉ. युवराज बढे, जगदीश खर्चे, सानिका सावंत, शशिकला कारके, रेखा भेगडे, कृष्णा कारके आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश सुपे, लोकेश महाजन, दीपक भिरुड, दिनेश वाघुळदे, अरुण बढे, सुनील जावळे, भरत नेमाडे यांनी परिश्रम घेतले.