पृथ्वीवरील जीवन संपुष्टात येणार, इतर ग्रहांवर जीवन शोधणे हा शेवटचा मार्ग; नासाने काय सांगितले वाचा…

NASA – पृथ्वीच्या वातावरणात असे बदल होतील की येथील ऑक्‍सिजन मोठ्या प्रमाणात कमी होईल. यामुळे पृथ्वीवरील सध्याचे एरोबिक जीवन संपुष्टात येणार आहे. यामध्ये मानवांचाही सहभाग असेल. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, याआधी मानवांसाठी योग्य दुसरा ग्रह शोधावा लागेल. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे.

हा अभ्यास अमेरिकेच्या नॅशनल एरॉनॉटिक्‍स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन अर्थात नासाच्या नेक्‍सएसएस प्रकल्पात करण्यात आला. या अभ्यासात पृथ्वीखेरीज अन्य ग्रहांवरील जीवनाचा शोध घेतला जात आहे.

जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीचे शास्त्रज्ञ क्रिस रेनहार्ड म्हणाले की, पृथ्वीवर दोन प्रकारचे बदल होत आहेत. लाखो वर्षांपासून सुरू असलेली आणि पृथ्वीला वेगवेगळ्या टप्प्यांवर नेणारी प्रक्रिया बदलते आहे. यातून होणारे बदल पृथ्वीवर दूरगामी परिणाम करतात.

दुसरीकडे, ते बदल खूप वेगाने होतात, परंतु त्यांचे परिणाम खूप खोल असतात आणि त्यामुळे पृथ्वीच्या प्रक्रियेत मोठे किंवा दीर्घकाळ टिकणारे बदलही होऊ शकतात. मानवी हस्तक्षेपामुळे होणारे हवामान बदलदेखील याचाच एक भाग आहे.

रेनहार्ड म्हणाले की, या बदलाचा परिणाम म्हणजे पृथ्वीवरील ऑक्‍सिजनवर अवलंबून असलेले जीवन संपुष्टात येईल. त्यावेळी, म्हणजे काही हजार वर्षांनी एका वेगळ्याच ग्रहाची आवश्‍यकता पृथ्वीवरील सजीवांना पडेल. संशोधकांनी पृथ्वीच्या बायोस्फियरच्या जटिल मॉडेल्सचा वापर केला आहे. त्यतून हे निष्कर्ष निघाले आहेत, असे नासाने म्हटले आहे.