लायन्स सेलिब्रेशन टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

पुणे : इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्‍लब डिस्ट्रिक्‍ट डी-2 तर्फे लायन्स सेलिब्रेशन करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 13 ते 19 जानेवारी या कालावधीत होणार असून ही स्पर्धा नेहरू स्टेडियम मैदानावर होणार आहे.

डिस्ट्रिक्‍ट क्रीडा समितीचे मुख्य समीर तांबोळी यांनी सांगितले की, साखळी आणि बाद फेरीमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत एकूण निमंत्रित संघ सहभागी होणार आहेत. कोकणे स्टार्स, पुनित बालन ग्रुप, दादस इलेव्हन, दीक्षित रॉयल्स, नायर ईगल्स आणि साचीज सुपरनोव्हाज या संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पाहावयास मिळणार आहे.

स्पर्धेचे उद्‌घाटन सोमवार, 13 जानेवारी रोजी डिस्ट्रिक्‍ट गव्हर्नर डी-2 चे ओमप्रकाश पेठे आणि व्हाईस गव्हर्नर अभय शास्त्री यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी व्हाईस गव्हर्नर हेमंत नाईक, खेळाडू आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना रविवार, 19 जानेवारी रोजी होणार आहे.

तसेच या स्पर्धेत रोख पारितोषिके देण्यात येणार असल्याचे तांबोळी यांनी सांगितले. विजेत्या संघाला करंडक तर, उपविजेत्या संघाला करंडक मिळणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टिरक्षक सामनावीर आणि मालिकावीर अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
गतवर्षी मोहन कलाटे वॉरीयर्सने स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते.

 

Leave a Comment