satara | साहित्य, कला, विकास प्रतिष्ठानच्या पुरस्कारांचा शनिवारी वितरण

सातारा, (प्रतिनिधी) – येथील गुरुवर्य ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण विद्यार्थी निर्मित साहित्य, कला, विकास प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणार्‍या संशोधक व ग्रंथशिक्षक पुरस्कारांचे वितरण शनिवार, दि. 18 मे रोजी सायंकाळी 5 वाजता राजवाडा येथील भाऊसाहेब सोमण स्मारक मंदिरातील अश्वमेध अभ्यासिकेत होणार आहे.

यावेळी अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे कार्यवाह प्राचार्य डॉ. यशंवत पाटणे यांनी दिल.

त्यांनी सांगितले की, यावर्षीचा ज्येष्ठ कलावंत पुरस्कार प्रख्यात अभिनेते सयाजी शिंदे तसेच संशोधक पुरस्कार अहिल्याबाई होळकर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांना तर भाडळी येथील ग्रंथपाल सूर्यकांत गुंजवटे यांना ग्रंथशिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरु प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांच्या या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. डॉ. डी. व्ही. देशपांडे, उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुनिता उत्तेकर, कार्यवाह प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, सहकार्यवाह सौ. सुनिता कदम, कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे, विश्वस्त डॉ. राजेंद्र माने, प्रा. एल. जी. पाटील यांनी केले आहे.