महिला दिनानिमित्त राज्य सरकारचे खास गिफ्ट

मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होत आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे. करोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अशा वेळी मोठ्या खर्चाला कात्री लागण्याची शक्यता आहे. पण जनतेला काय दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • फास्ट ट्रॅक कोर्टांसाठी 103 कोटी रुपये

  • मुंबईत रेल्वे रुळांवरील 7 उड्डाणपूल उभारणार

  • ऊर्जा विभागासाठी 9 हजार कोटी रुपयांची तरतूद

  • 25 हजार मेगावॅटचे अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारणार

  •  ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिनींना बसने मोफत प्रवास राज्यव्यापी योजना, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नावाने योजना, 1500 हायब्रीड बस उपलब्ध करून देणार

  • जीर्ण अवस्थेत असलेल्या शाळांच्या पुनरुज्जीवनासाठी 3000 कोटींची तरतूद

  • पुणे शहरात नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार

  • महिला दिनी मोठी घोषणा, राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना, घर खरेदी करताना महिलेच्या नावाने घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देणार

  • नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर इलेक्ट्रॉनिक बससाठी चार्जर सेंटर उभारणार

  • शिर्डी विमानतळावर रात्रीच्या विमान वाहतूक व्यवस्था अंतिम टप्यात

  • घरकूल योजनांनासाठी – २९२४ कोटी

  • रमाई घरकुल योजना 6 हजार 829 कोटी

  • १२ पर्यंत मुलभूत सुधारणाकरता – जागतिक बॅंकेच्या मदतीने – ९२८ कोटी

  • शासकीय जिल्हा परिषद शाळा साठी 3 हजार कोटी

  • सातारा सैनिक शाळांला 300 कोटी

  • प्रत्येक विभागीय जिल्ह्यात राजीव गांधी विज्ञान पार्क उभारणार

  • प्रत्येक बिभागीय जिल्यात राजीव गांधी विज्ञान पार्क

  • आय टी आय साठी शिकवू उमेदवारांना पाच हजार रुपय

  • जलजीवन मिशन – ८४ लाख ७८ हजार नळजोडण्या

  • महावितरणला थकीत बिलात ३३ टक्के सूट

  • एसटी विभागाला  1 हजार 400 कोटी निधी

– पुणे-नाशिक मार्गावर 24 प्रकल्प

– सहकार व पणन विभागासाठी 1284 कोटी रुपये देणार

  • प्रधानमंत्री सिंचन योजनेंतर्गत 26 प्रकल्पांना 21698 कोटी

  •  गोसीखुर्द प्रकल्पासाठी 1 हजार कोटींची तरतूद

  • महत्वाच्या 12 धरणांच्या बळकटीसाठी 624 कोटी

  • स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 400 कोटी रुपयांची तरतूद

  • पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणार

  • पूर्व द्रुतगती मार्गाला विलासराव देशमुख यांचे नाव

  • जलसंपदा विभागासाठी 12,919 कोटींची तरतूद, पशुसंवर्धन व मत्स्य विभागासाठी 3,700 कोटींची तरतूद

  • बाजार समित्यांच्या बळकटीसाठी 2 हजार कोटींची योजना. 4 वर्षात बाजारसमित्यांसाठी 2 हजार कोटी

  •  पक्का गोठा बांधण्यासाठी अर्थसहाय्य देणार, 2021- 22 कृषी पशु संवर्धन योजनेसाठी 3274 कोटी प्रस्तावित

  • चार कृषी विद्यापीठांना दरवर्षी 200 कोटी रुपये देणार, राज्यभरात अहिल्याबाई होळकरांच्या नावाने तालुका स्तरावर रोपवाटीका केंद्र

  • एपीएमसीच्या बळकटीकरणासाठी २ हजार कोटींच्या योजनेची घोषणा

  • कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी १,५०० कोटींचा महावितरणला निधी दिला जाणार. तसेच विकेल ते पिकेल योजनेला २१०० कोटी रुपयांची तरतूद

  • ३ लाख मर्यादा पीक कर्ज घेऊन वेळेत परत करणाऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज

  • पुण्यात जैवसुरक्षा प्रयोगशाळा उभारणार

– राज्यातील ११ परिचारिक प्रशिक्षण वर्गांचे महाविद्यालयात रुपांतर करणार येणार. लातूरच्या रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण इमारतीसाठी ७३ कोटी देणार. ससून रुग्णालयातील कर्मचारी निवासासाठी २८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आटपाडीच्या ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय बनवणार. मोशी येथे आरोग्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार. आरोग्य विभागास यंदा २९०० कोटी रुपये सरकारकडून मंजूर करण्यात आले आहेत. तर वैद्यकीय शिक्षण विभागास १५१७ कोटी देणार.

  • राज्यातील ज्या रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक उपाययोजना नसलेल्या रुग्णालयात ही व्यवस्था करण्यात येईल, असं अजित पवार म्हणाले.

  • सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, नाशिक आणि सातारा येथे वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करणार.

  • नगर पंचायती आणि नगरपरिषदांमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ७ हजार ५ कोटी देणार.

  • महिला दिनाच्या शुभेच्छा देत अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात केली.

Leave a Comment