‘…तर मोठे अर्थसंकट निर्माण होईल’

मुंबई – लॉकडाउनची शिस्त पाळली नाही तर अर्थसंकट निर्माण होईल अशी भीती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली.

राज ठाकरे म्हणाले कि, सर्वांना नम्र विनंती आहे लॉकडाउन गांभीर्यने घ्यावा. लोकांसमोर अनेक प्रश्न आहेत. जीवनावश्यक वस्तू सरकार उपलब्ध करत आहे. लॉकडाउनचे दिवस वाढवले गेले तर त्याच्या होणाऱ्या परिणामांची भीती आहे. उद्योगधद्यांची भीती वाटते. परिस्थिती कठिण होईल. तसंच आर्थिक मोठं आर्थिक संकट येईल. त्यामुळे उद्योगधंद्यावर परिणाम होईल, नोकऱ्या जातील. हे सगळं आपल्या एका चुकीमुळे होणार आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.

तसेच, धान्याचा काळा बाजार करणाऱ्यांना फोडून काढले पाहिजे. ही काळा बाजार करायची वेळ आहे का, असा प्रश्नही राज ठाकरे यांनी विचारला आहे.

Leave a Comment