Lok Sabha Election 2024 : आमदार मकरंद पाटलांच्या पदरी निराशा; लोकसभेची जागा भाजपला, भूमिकेबाबत उत्सुकता….

पाचगणी – सातारा लोसकभा मतदारसंघात महायुतीकडून खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. महायुतीतील या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार) रस्सीखेच करण्यात आली. मात्र, अजित पवारा यांना सातारची उमेदवारी मिळवण्यात यश आले नाही. त्यामुळे वाई मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांच्या पदरी पुन्हा निराशा पडली.

राज्यातील घडामोडीत कही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. आमदार मकरंद पाटील अखेर अजित पवार गटात सामील झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मकरंद पाटील यांना देवगिरीवर मंत्रिपद देण्याचा शब्द दिला होता.

मात्र, अजित पवार यांना शब्द पूर्ण करता आलेला नाही. मंत्रिपदाने हुलकावणी दिली असताना आता आपल्या भावाला नितीन पाटील यांना लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे मकरंद पाटील यांच्या पदरी निरासा आल्याची चर्चा मतदारसंघात सुरु आहे.

वास्तविक जिल्ह्याच्या राजकारणात मकरंद पाटील सयंमी स्वभावाने कार्यरत असतात. आता जिल्ह्यात महाविकास आघाडी व महायुतीमधील लढत चुरशीची होणार आहे. मात्र, वाई मतदारसंघातील मकरंद पाटील यांच्या भूमिकेबद्दल जिल्ह्यात उत्सुकता आहे.