‘राहुल गांधींनी अग्निवीर भरती समजून घ्यावी’ अमित शहांचे सडेतोड उत्तर..

Lok Sabha Election 2024 । चार वर्षांच्या कंत्राटी स्वरूपाच्या लष्कर भरतीसाठी मोदी सरकारने जी अग्निपथ योजना सुरू केली आहे तो थेट राष्ट्रीय सुरक्षेशीच खेळण्याचा प्रकार असून त्यामुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे’ अशी टीका काँग्रेसने पुन्हा एकदा केली आहे.

इंडिया आघाडीचे सरकार सततेवर आल्यानंतर ही योजना तातडीने रद्द केली जाईल असेही कॉंग्रेसने म्हटले आहे. अग्निपथ योजना लागू झाल्यानंतर तरूणांचे लष्कर भरतीचे आकर्षण कमी झाले आणि लष्कर भरतीकडील युवकांचा प्रवाह कमी झाला असेही कॉंग्रेसचे म्हणणे आहे.

यावर आता  गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी यांनी अग्निवीर भरतीला समजून घ्यावे असे म्हणत प्रतिउत्तर दिल आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीतील भाजपने ‘चार सौ पार’चा नारा का दिला ते  ‘भाजप संविधान बदलणार’ या विरोधकांच्या आरोपांना आणि अग्निवीर भरतीच्या विरोधावर उत्तरे दिली आहे.

Lok Sabha Election 2024 । अग्निवीर भरतीबाबत अमित शाह म्हणाले,
‘काँग्रेसची समस्या ही आहे की त्यांना अर्ध्या पानापेक्षा जास्त वाचता येत नाही. त्यांनाही ही योजना समजलेली नाही. लष्करातील जवानांचे सरासरी वय कमी करण्यासाठी ही योजना आहे. अग्निवीरमध्ये 100 सैनिकांपैकी 25 सैनिक कायम होतील अशी व्यवस्था आहे. उर्वरितांना सरकार, पोलिस दल इत्यादींकडून सूट आणि इतर फायदे दिले जातील. कामावरून परतल्यावर एकही अग्निवीर निष्क्रिय बसणार नाही. त्यांच्यासाठी निमलष्करी दल आणि राज्य पोलिसांमध्ये नोकऱ्या असतील. त्यांना निधी आणि पदवीही मिळेल.’ असेही ते म्हणाले आहे.

Lok Sabha Election 2024 । ‘मोजणीपर्यंत बोलू मग रजेवर जाऊ’
काँग्रेसवर हल्लाबोल करताना अमित शहा म्हणाले की, या लोकांना खोटे बोलण्याचे व्यसन लागले आहे. पुन्हा पुन्हा खोटे बोलतात. मतमोजणी होईपर्यंत बोलणार आणि मग रजेवर जाणार अशी यांची काम करण्याची पद्धत आहे. तिथून परत आल्यावर नवीन खोटे बोलणार.असेही ते म्हणाले आहे. राहुल गांधी यांनी हिमाचलमधील महिलांना वचन दिले होते. ती अजूनही वाट पाहत आहे. नोकरीचे आश्वासनही दिले होते. सर्व आश्वासने व्यर्थच राहिली. ही अनुवांशिक समस्या आहे. इंदिराजींनीही गरिबी हटवण्याचे आश्वासन दिले होते. पण मोदीजींनी गरिबांना त्यांचा हक्क दिला.’ असा दावाही त्यांनी केला आहे.

Lok Sabha Election 2024 । ‘मी देशातील जनतेला वचन देतो…
‘भाजपला 400 पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर राज्यघटना बदलेल’ या विरोधकांच्या आरोपावर अमित शहा म्हणाले की, 2014 मध्ये देशातील जनतेने नरेंद्र मोदींना ही सत्ता दिली होती. ते संविधानाच्या नावावर आरक्षणाबाबत बोलत आहेत, तर ते स्वत: हे काम करत आहेत. बंगाल आणि कर्नाटकातही त्यांनी असेच केले. मी देशातील जनतेला वचन देतो की असे कधीही होऊ दिले जाणार नाही. देशात धर्माच्या आधारावर आरक्षणाची व्यवस्था नाही.