लक्षद्वीपवरील टीकेनंतर महानायक संतापले; मालदीवला उद्देशून म्हणाले, “भारत आत्मनिर्भर है..!’

Amitabh Bachchan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली. या भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. यावरुन आतामालदीव आणि लक्षद्वीपची तुलना सुरू झाली. यानंतर पीएम मोदींनी देशवासियांना देखील लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले. याची आता मालदीव सरकारला काळजी वाटू लागली.

मालदीवमधील मंत्री आणि नेत्यांनी पीएम मोदींवर टीका करण्यास सुरूवात केली. प्रकरणाबाबत मालदीवच्या एका मंत्र्याने केलेल्या पोस्टवरून वाद निर्माण झाला आहे. रियम शिउना, मलशा शरीफ आणि अब्दुल्ला महजूम मजीद या तीन मंत्र्यांना त्यांच्या पदावरून देखील हटवण्यात आलं आहे.

दरम्यान, या मुद्द्यावरून दोन्ही देशांचे युजर्स सोशल मीडियावर आपसात भिडले आहेत. सलमान खान, अक्षय कुमार, जॉन अब्राहम, सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गजांनी मालदीवला खडेबोल सुनावल्यानंतर आता अमिताभ बच्चनही मैदानात उतरले आहेत. विरेंद्र सेहवागने केलेलं ट्वीट रिट्वीट करत त्यांनी लक्षद्वीपला पाठिंबा दिला आहे.

विरेंद्र सेहवागचं ट्वीट शेअर करत ते लिहितात, ‘विरु पाजी…हे खूपच समर्पक आहे आणि आपल्या जमिनीच्या अधिकाराचं आहे. मी लक्षद्वीप आणि अंदमानला गेलो आहे. खूपच सुंदर ठिकाणं आहेत. तिथला समुद्रकिनारा आणि अंडर वॉटर अनुभव तर अविश्वसनीय आहे. हम भारत है, हम आत्मनिर्भर है, हमारी आत्मनिर्भरता पे आँच मत डालिये’ असं बिग बी म्हणाले आहेत.

मालदीवचे मंत्री अब्दुल्ला मोहजुम मजीद यांनी पोस्ट –

ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “मालदीवच्या पर्यटनाला महत्त्व दिल्याबद्दल मी भारतीय पर्यटनाला शुभेच्छा देतो. परंतु भारताला आमच्यासोबतच्या पर्यटन स्पर्धेला काठीण्यपातळीवर सामोरे जावे लागेल. आमची एकट्या रिसॉर्टची पायाभूत सुविधा त्यांच्या संपूर्ण पायाभूत सुविधांपेक्षा जास्त आहे. ही पोस्टमध्ये मालदीवचे मंत्री मजीद यांनी पीएम मोदींनाही टॅग केली.