पुणे, पिंपरी-चिंचवडमधील शाळा पुढील 15 दिवस बंद राहणार – मुख्यमंत्री ठाकरे

पुणे – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा वगळता पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा, व्यायामशाळा, चित्रपटगृहे,नाट्यगृहे, माॅल्स बंद ठेवण्यात येणार आहेत. ही अंमलबजावणी शुक्रवारी (दि.13) मध्यरात्रीपासून पुढील 15 दिवसांसाठी असणार आहे. असे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज विधानपरिषदेत सांगितले आहे.  

तसेच आज मध्यरात्रीपासून मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर येथील जिम, जलतरण तलाव, नाट्यगृहे, चित्रपट गृहे बंद राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. तसेच राज्यात आपत्कालीन कायदा लागु करण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला. कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी लोकांनी अनावश्यक प्रवास आणि गर्दी टाळली पाहिजे असं आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलं. 

खासगी क्षेत्रातील कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम चा पर्याय खासगी कंपन्यांच्या मालकांनी द्यावा , असं आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

कोरोना व्हायरसचा फैलाव होऊ नये यासाठी लोकांनी अनावश्यक प्रवास करू नये तसेच गर्दीचे ठिकाण टाळावे असे देखील आवाहन उध्दव ठाकरे यांनी केले आहे. व्हायरसचा फटका खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्याला बसलेला नाही. मात्र हे संकट हे उंबरठ्यावरुनच परत जावं यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हे आवाहन करतो आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाच्या रूंग्णाची संख्या वाढत आहे. प्रशासन याबाबत योग्य ती खबरदारी घेत आहे. राज्यात हा आकडा 17 वर पोहचला असून पुणे आणि पिंपरी-चिंंचवड शहरात सर्वाधिक रूग्ण आढळले आहेत. पिंपरीचिंचवडमध्ये कोरोना बांधिताची संख्या 10 वर पोहचली आहे.

Leave a Comment