Breaking : परमबीर सिंहांनी दोन कोटी स्वीकारले; ‘या’ ६ जणांसह दुसरा गुन्हा दाखल, जाणून घ्या नावे

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी काल गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आज पुन्हा 2 कोटी रूपयांची मागणी केल्याच्या आरोपाखाली परमबीर सिंह यांच्यासह इतर 6 जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्याचे आयुक्त असताना खोट्या गुन्ह्यात अडकून एकाकडून ४.६८ कोटी रुपये उकळल्याप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे निम्मी रक्कम ठाण्यातील त्याच्या तत्कालिन शासकीय बंगल्यात वसूल करून घेतली असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच फिर्यादीच्या आईच्या नावावर असलेल्या ८ कोटीचा भूखंड जबरदस्ततीने केवळएक कोटीला खरेदी खत बनवून घेतला आहे.

परमबीर सिंग यांचे सोबत संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर व मणेरे असे सह आरोपी आहेत. शरद मुरलीधर अग्रवाल या बिल्डरने त्याच्याविरुद्ध ठाणे शहर पोलीस आयुक्तालयमध्ये कोपरी पोलिस स्टेशन मध्ये २ कोटी रुपयांची खंडणी मागितली व जमिनी बळजबरीने नावावर करण्यात असल्याच्या आरोपावरुन फिर्याद दिली आहे.

काल मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. सिंह यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात केला असून यामध्ये ६ पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. त्यानंतर आज पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान खंडणीचा दुसरा गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली आहे.

परमबीर सिंह यांच्याविरुद्ध एका बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनंतर मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात सिंह यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल केला होता. यामध्ये ६ पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यानंतर आज दुसरा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादीमध्ये 2 कोटी रूपयांची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात परमबीर सिंह यांनी १०० कोटी वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर देशमुख यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले होते. दरम्यान, परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ होत आहे. परमबीर सिंह यांची यापुर्वीच चौकशी सुरू करण्यात आली आहे