उत्तम राखा पोटाचे आरोग्य : गरम पाणी प्या

संपूर्ण शरीर निरोगी ठेवण्यासाठी पचनक्रिया उत्तम राखणे आवश्‍यक आहे. यासाठी काही सवयी बदलण्याचा आग्रह धरणे आवश्‍यक आहे. जर आपण दिवसभर भरपूर पाणी प्यायले तर त्याचे अनेक फायदे होऊ शकतात. दुसरीकडे, सकाळी रिकाम्यापोटी कोमट पाणी प्यायल्यास ते आणखी फायदेशीर ठरू शकते. दररोज सकाळी दोन ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय पोटातील सर्व कचरा बाहेर काढून पचनाच्या आरोग्यामध्ये लक्षणीय सुधारणा करण्यास मदत करू शकते. गरम पाणी पिण्याची सवय आतड्यांना डिटॉक्‍स करण्यापासून ते लिव्हरपर्यंत आणि चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे.

सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील चयापचय क्रिया सक्रिय होते, ज्यामुळे पचन चांगले होतेच पण वजन कमी करणेदेखील सोपे होते. कोमट पाणी प्यायल्याने आतडे स्वच्छ होण्यास आणि शरीरातील कचरा कमी होण्यास मदत होते, पोट फुगणे, बद्धकोष्ठता, मूळव्याध समस्या टाळता येतात. सर्वांनी ही सवय नियमितपणे लावली पाहिजे.

पोटाच्या अनेक समस्या दूर होतात
डिहायड्रेशन हा बद्धकोष्ठतेच्या समस्येतील एक प्रमुख घटक मानला जातो, दररोज सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि पचनक्रिया देखील सुधारते. आतडे आणि यकृत स्वच्छ करणे आणि टाकाऊ पदार्थ काढून टाकणे यामुळे या अवयवांचे कार्य आणखी सुधारू शकते. गरम पाणी आतडे निरोगी ठेवण्यासाठी आणि शस्त्रक्रियेनंतर गॅसेस कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हायड्रेटेड राहिल्याने मल बाहेर टाकणेही सोपे होते.

चरबी जाळण्यास मदत करते
वजन कमी करायचे असले तरी रोज सकाळी गरम पाणी प्यायल्याने विशेष फायदे मिळू शकतात. ही सवय तुमची चयापचय क्रिया सक्रिय करते, परिणामी वजन कमी करण्यास मदत करते. गरम पाण्यामुळे शरीरातील चरबीचे रेणू नष्ट होतात आणि पचन सुलभ होते. या सवयीने शरीरातील अतिरिक्‍त चरबीचा साठाही कमी करता येतो. ही सवय वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही फायदेशीर आहे. त्यासाठी रोज सकाळी 4 ते 5 गरम पाणी प्या.

सर्दी-ऍलर्जीचा त्रासही कमी होतो
सकाळी गरम पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्‍तीदेखील मजबूत होते. विशेषतः थंड वातावरणात याचे अनेक फायदे आहेत. कोमट पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान सामान्य राहण्यास मदत होते. याशिवाय, घशातील संसर्ग आणि सर्दीची समस्या कमी करण्यासाठी देखील हा एक प्रभावी उपाय आहे. घशातील खवखव दूर करण्यासाठी या सवयीचा तुम्हाला विशेष फायदा होऊ शकतो.

आनंदी राहण्याचा उत्तम मार्ग
कोमट पाणी पिण्याने मध्यवर्ती मज्जासंस्थेचे कार्य सुधारते, ज्यामुळे तुम्हाला कमी चिंता वाटते.