पुणे शहर पोलीस दलात मोठा फेरबदल; 21 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या..

शहर पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या बदल्या करण्यात आल्या. याबाबतचा आदेश गुरुवारी (ता. ६) पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. बदल्या करण्यात आलेल्यांमध्ये पाच सहायक पोलिस आयुक्त, पाच वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नऊ पोलिस निरीक्षक आणि दोन उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.