मलायका अरोरा घेतेयं सुट्ट्यांचा आनंद; शेअर केले खास फोटो

Malaika Arora Vacation Photos|  अभिनेत्री मलायका अरोरा कधी तिच्या फॅशनमुळे तर कधी अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत असते. मागील काही दिवसांपासून तिच्या ब्रेकअपच्या चर्चांच्या अनेक बातम्या समोर आल्या. यादरम्यान आता मलायकाने तिच्या लेटेस्ट व्हेकेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी तिच्यासोबत अर्जुन कपूर दिसत नाही. तर मलायका मैत्रीणींसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

मलायकाने इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने खास मैत्रिणींसोबत पांढरा आणि गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केल्याचे दिसते. तसेच मलायका तिच्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेतानाही दिसते. व्हेकेशनदरम्यानचा मलायकाचा हॉट आणि बोल्ड अवतार चाहत्यांच्या देखील चांगलाच पसंतीस पडला आहे. यातील एका फोटोत ती काळ्या रंगाची शॉर्ट्स आणि बिकिनी टॉप घालून समुद्राच्या किनाऱ्यावर पोज देताना दिसत आहे. सध्या तिच्या या फोटोवर लाइक आणि कमेन्टचा वर्षाव होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

दरम्यान, मलायकाने 1998 मध्ये अरबाजसोबत लग्न केले होते. त्यानंतर 2017 मध्ये मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2019 मध्ये मलायका आणि अर्जुन यांनी आपल्या नात्याचा स्वीकार केला. गेल्या 8 वर्षांपासून मलायका-अर्जुन एकत्र आहेत. मात्र यादरम्यान त्यांच्या बऱ्याचदा ब्रेकअपच्या अफवा देखील समोर  आल्या.

अभिनेत्री मलायकाला छैय्या छैय्या गाण्यामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. मलायका ही फॅशन शोचे परीक्षण करते. तर अभिनेता अर्जुनने ‘इश्कजादे’ या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. अर्जुनच्या गुंडे, तेवर आणि हाफ गर्लफ्रेंड या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. Malaika Arora Vacation Photos|

हेही वाचा: