मना तुझ्या विना..! ‘जग्गु आणि ज्युलिएट’ची जबरदस्त केमेस्ट्री दाखवणार गाणं उद्या येणारं प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई – ‘पुनीत बालन स्टुडीओजची निर्मिती असलेला ‘जग्गु आणि ज्युलिएट’ या चित्रपटाचा टीजर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची हटके नावामुळे खूपच चर्चा होती. त्यात टीजरमध्ये अभिनेता अमेय वाघ एका आगरी कोळी तरुणाच्या भूमिकेत तर अभिनेत्री वैदेही परशुरामी विदेशातून आलेल्या तरुणीच्या भूमिकेत असल्याच्या पाहायला मिळाले. चित्रपटाची उत्कंठा चांगलीच वाढलेली असताना आता चित्रपटाला एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘मना तुझ्या विना… न कळले कुणा.. ही भावना’ असे या गाण्याचे बोल असून ‘अजय अतुल’ यांनी या गाण्याचे कंपोझिशन केल्याचे समजते. या गाण्याची पहिली झलक आज सर्वांसमोर आलेली असली तरी हे पूर्ण गाणं उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खास तरुणाईला आकर्षित करणार हे गाणं असणार आहे. ज्यातून अमेय-वैदेहीची लव्ह केमेस्ट्री पाहायला मिळणार आहे.

‘जग्गू आणि जुलिएट’ नावावरूनच हा चित्रपट काहीतरी हटके घेऊन येणार हे निश्चित झालं होत.त्यात ‘तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी’ या टॅगलाईनमुळे उत्कंठा आणखी वाढली होती. देवभूमी अर्थात उत्तराखंड येथून ही लव्हस्टोरी सुरु होत असल्याचे टीजरवरून समजले.अजय अतुलच्या तुफान म्यूजिकची साथ असल्यामुळे येणार हे गाणं सुपरहिट होणार असल्याचा विश्वास चाहत्यांना आहे.

या चित्रपटामुळे अमेय-वैदेही ही जोडी झोंबिवली या चित्रपटनानंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. २००८ मध्ये ‘यलो’ या चित्रपटाद्वारे सामाजिक भान असलेला विषय हाताळणारे महेश लिमये यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यासोबतच चित्रपटात अजय अतुलचं जबरदस्त म्युजिक ऐकायला मिळणार आहे. येत्या १० फेब्रुवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.