Cuteness Overloaded! आदिनाथ कोठारेची लेक जिजा बनली ‘सोशल मीडिया सेन्सेशन’

मुंबई- अभिनेता आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांची मुलगी जिजा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते आहे.  आदिनाथ आणि उर्मिला सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय असतात. आदिनाथने जिजाचा एक व्हीडियो शेअर केला आहे.

आदिनाथ- उर्मिला नेहमीच जिजाच्या करामतीचे व्हीडियो शेअर करत असतात. ती नेमकी काय काय करते हे त्या व्हीडियोतून दाखवत असतात. यावेळी मात्र जिजाचा हा व्हीडियो सध्या सोशल मीडिया सेन्सेशन बनला आहे. अनेक तरुण तरुणींनी जिजाचा व्हीडियो स्टोरीवर शेअर केला आहे.

या व्हीडियोमध्ये ती टेरेसवर बसून कबूतरांना तांदूळ भरवताना दिसते आहे आणि बाबा आदिनाथबरोबर गोड गप्पा मारताना दिसते आहे. अळिमिळी गुपचिळी या कार्यक्रमात ज्यावेळी ती आली होती. त्यावेळी तिने अनेक प्राणी पक्षांचे आवाज काढून दाखवले होते.

दरम्यान, जिजा सध्या तिची आई उर्मिलाकडून नृत्याचे धडे घेत आहे. त्याचे अनेक व्हीडियो उर्मिला कायम शेअर करत असते. मायलेकी दोघीही नव्यानव्या गोष्टी करताना दिसतात.

 

Leave a Comment