उर्मिला-आदिनाथमध्ये खरंच दुरावा? अभिनेत्याने स्वतः केला खुलासा म्हणाला…

मुंबई – मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडी अभिनेता आदिनाथ कोठारे व अभिनेत्री उर्मिला कोठारे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात. यावेळेस ही जोडी चर्चेत येण्याचे वेगळे कारण आहे. आदिनाथ व उर्मिला यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चेने सद्या सोशल मिडियावर जोर धरला आहे. हे दोघे वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले आहेत. त्यामुळे ते अनेक दिवसांपासून एकत्र दिसले नाहीत. या चर्चेला आदिनाथने पुर्णविराम देत स्वतः खुलासा केला आहे.

एका मराठी वेबसाईटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या रिपोर्टनुसार, आदिनाथ यावर प्रतिक्रिया देताना म्हणाला की, ”उर्मिला आणि माझ्यात सर्वकाही छान सुरु आहे. आम्ही एकमेकांसोबत खूश आहोत. माझ्या आणि उर्मिलाबद्दल अशा अफवा पसरवणाऱ्या आणि चर्चा करणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाही’. असे म्हणत अभिनेत्याने या चर्चानां पूर्णविराम लावला आहे.