रणबीर कपूरच्या चित्रपटात झळकणार मराठमोळा अभिनेता

Ranbir Kapoor Ramayan Film| अभिनेता रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाची मागील काही दिवसांपासून चर्चा रंगली आहे. या चित्रपटाबाबत सातत्याने काही अपडेट समोर येत आहेत. यातच आता या चित्रपटामध्ये अभिनेता आदिनाथ कोठारेची एन्ट्री होणार असल्याची चर्चा होत आहे.

या सिनेमात अभिनेता रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर भगवान रामचा धाकटा भाऊ लक्ष्मणच्या भूमिकेसाठी टीव्ही अभिनेता रवी दुबेची निवड करण्यात आली आहे. आता प्रभू रामाचा दुसरा धाकटा भाऊ भरत याच्या भूमिकेत आदिनाथ दिसणार असल्याचे म्हंटले जात आहे.

रणबीर कपूर, साई पल्लवी आणि सनी देओल यांच्या रामायण चित्रपटामध्ये आदिनाथ कोठारे भरतच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. आदिनाथने कबीर खानच्या ’83’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, ज्यामध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात अभिनेत्याने माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांची भूमिका साकारली होती. यानंतर आता तो रामायण चित्रपटात दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

नितेश तिवारी यांच्या रामायण चित्रपटामध्ये रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत, यश रावणाच्या भूमिकेत, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. त्याचसोबत लक्ष्मणाच्या भूमिकेमध्ये रवी दुबे, कैकयीच्या भूमिकेमध्ये लारा दत्ता, श्रुपनखाच्या भूमिकेमध्ये रकुल प्रीत सिंग दिसणार आहे. तर प्रभू रामाचे भाऊ भरतच्या भूमिकेमध्ये मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे दिसणार आहे.  दरम्यान, आदिनाथ कोठारेने मराठीसोबत हिंदी चित्रपट आणि वेबसीरिजमध्येही काम केले आहे.

हेही वाचा: 

वर्धा लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळणार ? कराळे गुरुजींनी आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत केला ‘प्रवेश’