मेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस शाहरुख खानची भेट घेणार

नवी दिल्ली : मेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस, भारत दौर्‍यावर येणार आहेत. भारतातील अ‍ॅमेझॉन कंपनीला बाजारात अधिक बळकटीकरण करण्यासाठी ते भारत दौर्‍यावर येणार आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे.  त्यांची संपत्ती अंदाजे 131 अब्ज डॉलर्स आहे. या दौर्‍यावर जेफ बेझोस इथल्या काही महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांशी भेट घेण्याच्या विचारात आहेत.

हिंदी सिनेमाचा सुपरस्टार शाहरुख खान यांची ते भेट घेणार आहे. बेझोस तीन दिवसांच्या भारत दौर्‍यास 15 जानेवारीला सुरुवात करणार आहेत.  ते मेझॉनच्या भारतात सुरू असलेल्या सर्व कामकाजाचा आढावा घेतील तसेच नवीन योजना तयार करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याचीही त्यांनी योजना आखली आहे, परंतु या बैठकीची त्यांची योजना अद्याप निश्चित झालेली नाही. यासह ते रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करतील.

त्यांच्या या दौर्‍याची सर्वात खास गोष्ट म्हणजे हिंदी सिनेमाच्या कलाकारांना भेटणे. भारतात ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ हा देखील मेझॉनचा भाग आहे. हेच प्राइम व्हिडिओ मेगा इव्हेंट होस्ट करणार आहे ज्यामध्ये जेफ बेझोस दिसणार आहेत. या कार्यक्रमात जेफ सुपरस्टार शाहरुख खानबरोबर स्टेज शेअर करणार आहेत.

 

Leave a Comment