पुण्यात गतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार; चार नराधमांना अटक

पुणे – विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरातील दत्तवाडी परिसरात २५ वर्षीय गतिमंद मुलीवर चार नराधमांनी आळीपाळीने जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवत बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पाेलीस ठाण्यात चार जणां विराेधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आराेपींना अटक करण्यात आली आहे.

दुरवेश जाधव (वय-३६), श्रीकांत सराेदे (वय-३६), आदित्य पवार (१९) व आशिष माेहिते (१८) अशी याप्रकरणी अटक केलेल्या आराेपींची नावे आहे. सदर पिडित मुलगी गतिमंद असून तिला शुक्रवारी सायंकाळी पिडित मुलगी भारती विद्यापीठ परिसरातील घराकडे निघाली असताना, आदित्य पवार या आराेपीने तिला गाेड बाेलवुन स्वारगेट परिसरातून जनता वसाहत येथे नेले.

त्याठिकाणी इतर साथीदारांना बाेलवून घेत त्यांनी एका बंद खाेलीत तिच्यावर आळीपाळीने आराेपींनी बलात्कार केला. दरम्यान, मुलीच्या रडण्याचा आवाज खाेलीतून बाहेर आल्याने सदर ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना संशय आला व त्यांनी घरास बाहेरुन कडी लावत पाेलीसांना माहिती दिली. त्यानंतर दत्तवाडी पाेलीस घटनास्थळी दाखल हाेऊन त्यांनी चार आराेपींना अटक करत तरुणीची सुटका केली.

पाेलीसांनी याप्रकरणी आराेपींवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून दत्तवाडी पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर याबाबत पुढील तपास करत आहे. अटक करण्यात आलेल्या आराेपींपैकी श्रीकांत सराेदे हा सन २००९ मधील एका खुनाचे गुन्हयातील आराेपी असून न्यायालयात सबळ पुराव्या अभावी निर्दाेष सुटलेला आहे तर इतर आराेपी माेलमजुरीचे काम करणारे आहे. पाेलीसांनी पिडित मुलीची वैद्यकीय तपासणी करत तिला पालकांचे स्वाधीन केले आहे.

सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे पोलीस हवालदार कुंदन शिदे, राजु जाधव पोलीस अंमलदार गणेश कळसकर, अमोल झणझणे, जनार्जी श्रीमंगले, शिवाजी क्षिरसागर, शरद राऊत, अमित सुर्वे, अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले, दयानंद तेलगें, आस्मार, प्रमोद भोसले, विष्णू सुतार यांनी केली आहे.