पुण्यात उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदींची भेट

पुणे- पोलिस महासंचालकांच्या हिंदुस्थानी शिखर परिषदेचे केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज (शुक्रवारी) उद्धाटन झाले. बाणेर परिसरातील आयसर (हिंदुस्थानी विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था) संशोधन संस्थेच्या आवारात ही परिषद होत आहे. पुढील दोन दिवस ही परिषद सुरू असणार आहे.

दरम्यान, या परिषदेसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात दाखल झाले आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विमानतळावर पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यावेळी अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी देखील उपस्थित होते. उद्या (शनिवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व अधिकार्‍यांना संबोधित करणार लागणार आहे.

Leave a Comment