पुणे ते लोणावळा दरम्यान मेगाब्लॉक; आज दिवसभरात काही लोकल ट्रेन फेऱ्या रद्द

पुणे – पुणे-लोणावळा उपनगरीय सेक्शनवर महत्त्वाच्या इंजीनियरिंग आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवार (दि. 10 डिसेंबर) रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्याने काही लोकल ट्रेन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

अप उपनगरीय रद्द ट्रेन आणि वेळ

पुणे-लोणावळा – सकाळी 09.57, 11.17, दुपारी ३.00 , सायंकाळी 16.25, 18.02 वाजता सुटणाऱ्या सर्व ट्रेन रद्द.
शिवाजीनगर-तळेगाव दुपारी 15.47, सायंकाळी 17.20 वाजता सुटणारी लोकल रद्द

डाऊन उपनगरीय रद्द ट्रेन आणि वेळ

लोणावळा-शिवाजीनगर : सकाळी 10.05, सायंकाळी 17.30, 18.08, 19.35
लोणावळा- पुणे : 14.50. तळेगाव-पुणे सायंकाळी 16.40, 19.00.
तसेच मेल/एक्सप्रेस ट्रेनचे रेग्युलेशन ट्रेन क्रमांक 12164 एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस सुमारे साडेतीन तास उशिरा धावेल.