मानसिक आरोग्य

सतत घड्याळावर नजर, नुसती लगबग, कामावर जाण्याची धावपळ, लोकल पकडण्याची घाई. बसमध्ये शिरण्याची धडपड. रिक्षात चढण्याची धांदल. प्रत्येक क्षणी तणाव. हा तणाव आपल्या रोजच्या जगण्याचा भागच बनलाय. त्यातून लहान मुलेही सुटलेली नाहीत. त्यांनाही टाईमटेबल मागे लागलेले असते, प्रचंड स्पर्धा असते. गुणवत्तेचे ओझे असते.

रोजच्या धावपळीमुळे आज प्रत्येकाच्या जीवनात ताण-तणाव वाढत आहे. विशेष करून शहरी भागात प्रत्येक जण मानसिक तणावाखाली जगत असून तो जणू जीवनाचा एक भाग बनला आहे. भारतात प्रत्येक पाच व्यक्तीपैंकी एक जण मानसिक ताणतणावाचा शिकार असल्याचे आकडेवारी सांगते. तणावातूनच हिंसाचार वा आत्महत्येसारखं पाऊल उचललं जातं.
देशाच्या कॉर्पोरेट जगतातील परिस्थिती तर आणखीच भयंकर आहे. कामाच्या व्यापामुळे तणाव वाढत असून कॉर्पोरेट जगतात काम करणाऱ्या व्यक्ती दीर्घकाळ मानसिक तणावाखाली जगत असल्याचं सरकारच्या आकडेवारीतून उघड झालंय. 50 टक्के लोक हे व्यसनाच्या आहारी गेले आहेत तर 20 टक्के लोक खिन्नतेचे शिकार ठरले आहेत.

आज भारतात 26 कोटी लोक मानसिक आजाराचा सामना करत आहेत. जगातल्या आनंदी देशांच्या यादीत भारत 111व्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तान आणि बांगलादेश या क्रमवारीत भारताच्या पुढे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार मानसिक तणावाच्या बाबतीत भारत हा पहिल्या 15 देशांच्या यादीत आहे.
वाढतं शहरीकरण, बदलेलेली जीवनशैली, अपुरी झोप, खाण्यापीणाच्या बदललेल्या सवयी या सगळ्यांचा शरीरावर प्रतिकूल परिणाम होत असून मानसिक आरोग्य बिघडण्यास या बाबी कराणीभूत आहेत. ही सगळी पार्श्‍वभूमी पाहता आरोग्याविषयी अधिक जागृत होण्याची आवश्‍यकता आहे.

मानसिक आरोग्य म्हणजे काय, याचा विचार केला, तर ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या क्षमतेचा अनुभव येतो, ती जीवनातले सर्वसामान्य ताणतणाव सांभाळू शकते, उत्पादक काम करू शकते आणि समाजाला योगदान देऊ शकते. अशा अवस्थेला मानसिक आरोग्य म्हणता येईल. मानसिक आरोग्याचे प्रभाव शैक्षणिक निकालावर, उत्पादन क्षमतेवर, सकारात्मक व्यक्तिगत संबंधाच्या विकासावर, गुन्हेगारीच्या दरावर, व्यसनाधिनतेवर होतो.

केवळ रोगांपासून मुक्तता म्हणजे आरोग्य नाही, तर शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्वस्थता असणे म्हणजे आरोग्य. अशी जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची व्याख्या केलेली आहे. मानसिक आरोग्य म्हणजे मानसिक स्वस्थता, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या क्षमतेचा अनुभव येतो, जीवनातले सर्वसामान्य ताणतणाव ती सांभाळू शकते, उत्पादक काम करू शकते आणि समाजाला योगदान देऊ शकते. उत्पादन क्षमता, शैक्षणिक निकाल, सकारात्मक व्यक्तिगत संबंध, गुन्हेगारीचे प्रमाण, व्यसनाधीनता आदी गोष्टींवर मानसिक आरोग्याचे प्रभाव दिसतात. मानसिक विकारांचा परिणाम व्यक्तीच्या रोजच्या वगण्यावर दिसू शकतो. व्यवस्थित जेवणे, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, सुरक्षित लैंगिक संबंध, मद्य, तंबाखू वा कोणतेही व्यसन न करणे, नियमित औषधोपचार करणे यांचा परिणाम मानसिक आरोग्यावर होऊ शकतो.

मानसिकदृष्ट्या कमजोर व्यक्ती मानसिक विकारांना बळी पडू शकतात असा एक समज आहे. पण त्यात फारसे तथ्य नाही.

तंत्रिक प्रेषक ( न्यूरो ट्रांसमीटर्स): मानसिक विकाराचा संबंध आपल्या मेंदूमध्ये असलेल्या खास रसायनांच्या ज्याला तंत्रिका प्रेषक (न्यूरो ट्रांसमीटर्स) म्हणतात यांच्या असंतुलनाशी आहे. संतुलन बिघडले तर, मेंदूतून संदेश बरोबर पाठवले जात नाहीत.त्याने मानसिक विकाराची लक्षणे दिसतात. आनुवंशिकता (हेरिडिटी)हे देखील मानसिक विकारांचे एक कारण असू शकते. विशेषज्ज्ञ असे मानतात की मानसिक विकाराचा संबंध जनुकांमधील अनियमिततेशी आहे; पण फक्त एखाद्या जनुकाशी नाही. म्हणून एखादी व्यक्ती मानसिक विकाराबाबत अतिसंवेदनशील असली तरी तिला मानसिक विकार होईलच असे नाही. तणाव, वाईट गोष्ट घडणे, किंवा धक्कादायक घटना होणे. ह्याने एखाद्या अतिसंवेदनशील व्यक्तीवर मानसिक विकाराचा प्रभाव पडू शकतो किंवा सक्रिय होऊ शकतो.

राष्ट्रीय मानसिक आरोग्य धोरणाचा संबंध फक्त मानसिक विकाराशी नाही तर मानसिक आरोग्याचा सर्वसमावेशक प्रचार व प्रसारावर आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (थकज) ने मानसिक आरोग्य मजबूत करण्यास व प्रचार करण्यास सरकारांना पाठिंबा दिला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (थकज) ने मानसिक आरोग्य प्रचार करण्यासाठी प्रमाणाचे मूल्यांकन केलेले आहे. आणि ज्ञान पसरवण्यास व प्रभावशाली योजना धोरण आणि योजनेत सामील करण्यास शासनाबरोबर काम करत आहे.

Leave a Comment