nagar | गुणवंत विद्यार्थ्यांचा युवा प्रतिष्ठानच्यावतीने सन्मान

राहुरी, (प्रतिनिधी): सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देत असलेल्या राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी येथील विविध शाळांत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.

वैष्णवी चौक परिसरातील योगा भवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमास प्रा.दत्तात्रय वाणी, डॉ.रवींद्र वामन, डॉ.अनंतकुमार शेकोकार, शिवचरित्रकार हसन सय्यद, हिंदू रक्षक धर्म परिषद अध्यक्ष दत्तात्रय गागरे, डॉ.कांचन शेकोकार,उद्योजक संतोष कराळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक संस्थापक अध्यक्ष वसंत कदम यांनी केले. डॉ.कांचन शेकोकार यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत डॉक्टरेट पदवी मिळविल्याबद्दल गौरव करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवळाली प्रवरा, न्यू इंग्लिश स्कूल, देवळाली प्रवरा, वाणी सेंट्रल स्कूल,

गणेगाव, डिपॉल इंग्लिश मीडियम स्कूल, राहुरी फॅक्टरी, छत्रपती शिवाजी हायस्कुल, राहुरी फॅक्टरी, नूतन माध्यमिक विद्यालय, देवळाली प्रवरा आदी शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत जाधव यांनी तर आभार धनंजय विटनोर यांनी मानले.