#IPL2022 | आयपीएलसाठी आमदार आशिष शेलारांची बॅटिंग

मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या महाराष्ट्रात होत असलेल्या सामन्यांसाठी 25 ऐवजी 50 टक्के प्रेक्षकांना मैदानात उपस्तित राहण्यास परवानगी द्यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत केली.

विधानसभेत क्रिडा विषयक चर्चेवेळी त्यांनी हा मुद्दा मांडला. यंदाच्या आयपीएल स्पर्धेला येत्या शनिवारपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील साखळी फेरीतील लढती मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉन व नवी मुंबईतील डॉ. डीय वाय. पाटील या तीन स्टेडियमसह पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे स्टेडियमवर होणार आहेत. या सामन्यावेळी स्टेडियममध्ये 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश द्यावा, अशी मागणी शेलार यांनी केली.

नियोजित सामान्यांसाठी स्टेडियमध्ये 25 टक्के क्षमतेने प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली असली तरीही यातील काही तिकिटे शासनाशी संबंधित व्यक्तींना द्यावी लागतात. त्यामुळे सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी अगदी थोडी तिकिटे उपलब्ध होतात. त्यामुळे 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी द्यावी असेही ते म्हणाले.