महायुतीमध्ये नव्याने सामिल झालेल्या मनसेला शिर्डी लोकसभा मिळण्याची दाट शक्यता?

राजेंद्र वाघमारे 

नेवासा – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मुलख मैदानी तोफ राज्याचे माजी गृहराज्य मंञी तथा मनसेचे जेष्ठनेते बाळा नांदगांवकर यांची अनाहूतपणे महायुतीमध्ये नव्याने सामिल झालेल्या मनसेच्या वाट्याला शिर्डी लोकसभा मतदार संघाची जागा अनपेक्षितपणे मनसेकडे येण्याची दाट शक्यता असून या मतदार संघाची उमेदवारी मनसेचे जेष्ठनेते बाळा नांदगांवकर यांना मिळणार असल्याची खाञी विश्वासनिय सुञांनी दैनिक प्रभात’शी बोलतांना दिली.

बाळा नांदगावकर हे महाराष्ट्रातील मोठे दिग्गज नेते असून त्यांची राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून झालेली असून मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे ते विश्वासू सहकारी आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख नेते असून त्यांनी मांझगाव विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.

त्यानंतर २००९ मध्ये मनसेच्या तिकिटावर ते शिवडी मतदार संघातून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले असून मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे ते मोठे विश्वासू नेते असून नव्यानेच महायुतीमध्ये सामिल झालेल्या मनसेने शिर्डी मतदार संघ मनसेकडे देण्याची मागणी केलेली असून ही जागा महायुतीकडून मनसेच्या वाट्याला येवून शिर्डी लोकसभेची उमेदवारी मनसे नेते बाळा नांदगांवकर यांच्याकडे येणार असल्याच्या राजकिय हालचाली महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेतून सुरु असल्याची माहीती राजकिय सुञांनी यावेळी बोलतांना दिली आहे.