पुणे जिल्हा | मोबाइल हा महाभयंकर आजार

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – मोबाइल हा आजच्या नव्या पिढीला लागलेला महाभयंकर आजार आहे. वेळीच यातून बाहेर पडण्यासाठी पालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सचिन महाराज बेंडे यांनी येथे केले.

वाळद येथील श्री गणेश मंदिराचा 20 वर्धापनदिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. यानिमित्ताने शिवव्याख्याते सचिन महाराज बेंडे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला, यावेळी त्यांनी वरील आवाहन केले.

दरम्यान माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पत्नी कल्पना आढळराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, लोकनियुक्त सरपंच मनोहर पोखरकर यांच्या हस्ते महाआरती झाली.

यावेळी उपजिल्हाप्रमुख निलेश पवार, वाळदचे उपसरपंच विक्रम पोखरकर, जालिंदर पोखरकर, अंबर सावंत, अशोक पोखरकर, राम शिंदे, तानाजी कदम, दादाभाऊ वाळुंज, प्रभू पाचंगे, रामभाऊ ढेरंगे, लक्ष्मण पोखरकर, भरत पोखरकर, गणेश कोरडे, विश्वनाथ वाळुंज, पप्पू पोखरकर, रामदास पोखरकर, सुरेश पोखरकर, राम ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

वर्धापन दिनाचे औचित्य साधून झालेल्या विशेष हळदीकुंकू कार्यक्रमामध्ये सुमारे 400 महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी कल्पना आढळराव पाटील, स्वाती पोखरकर, सुरेखा पोखरकर, उपसरपंच,लक्ष्मीबाई पोखरकर, रेश्मा पोखरकर, शारदा कडलग, मीरा पोखरकर, प्रज्ञा पोखरकर ,सिंधु पोखरकर, सुवर्णा हुंडारे, प्रणाली पोखरकर,

अनिता दाभट, यशोद कोरडे, मनीषा जोरी, उषा पोखरकर, राधा पोखरकर, राजाश्री हुंडारे, नकुषा पोखरकर, सीमा दाभट, नयना झणकर, सुनीता सावंत आदी महिला प्रतिनिधी सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन सरपंच मनोहर पोखरकर उद्योजक अशोक पोखरकर व गणेश मित्र मंडळ चिंचेचीवाडी (वाळद) यांनी केले होते. सूत्रसंचालन विशाल शिंदे यांनी तर डॉ. लहू पोखरकर यांनी आभार मानले.