सर्वात जास्त बंदुका अमेरिकेमध्ये; जगभरात सर्वत्रच वाढलय गन कल्चर

वॉशिंग्टन – अमेरिकेसारख्या मोठ्या देशात सतत कोठेतरी गोळीबाराच्या घटना घडत असतात जगाच्या पाठीवरील इतर देशांमध्ये सुद्धा कधी ना कधी अशा घटना घडताना दिसतात याच पार्श्वभूमीवर स्वित्झर्लंडमध्ये एका सामाजिक संस्थेने या वाढत्या गन कल्चरचा अभ्यास केला असून त्याचे निष्कर्ष जाहीर केले आहेत.

या निष्कर्षाप्रमाणे जगभरातील देशांचा विचार करता सर्वात जास्त बंदुका अमेरिकेमध्ये आहेत अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशांमध्ये दर शंभर लोकसंख्येमागे बंदुकांची संख्या 120 आहे सर्वसाधारणपणे पाहता अफगाणिस्तान पाकिस्तान इराण किंवा इराक यासारख्या युद्धग्रस्त प्रदेशांमध्ये अशा शस्त्रांची संख्या जास्त असेल असा एक समज होता पण ह्या अभ्यासाने हा समज खोटा ठरवला असून अमेरिकेसारख्या सुसंस्कृत देशांमध्येच कौटुंबिक पातळीवर सुद्धा बंदुकांची संख्या वाढताना दिसत आहे अमेरिकेपाठोपाठ येमेन या देशामध्ये प्रतिव्यक्ती बंदुकांची संख्या जास्त आहे दर 100 व्यक्तींमागे येमेनमध्ये 54 लोकांकडे बंदूक आहेत सर्बियासारख्या देशांमध्ये हे प्रमाण 39 एवढे आहे.

अमेरिकेचाशेजारी असलेल्या कॅनडामध्ये मात्र 100 व्यक्तींमागे 34 व्यक्तींकडे बंदूक असल्याचे समोर आले आहे सायप्रस लेबनॉन फिनलँड आइसलँड या छोट्या देशांमध्ये सुद्धा दर 100 व्यक्तीं मागे सुमारे 30 व्यक्तींकडे बंदुका असल्याचे लक्षात आले आहे अमेरिकेत दर माणसी बंदुकांचे प्रमाण सर्वात जास्त असल्यानेच या देशामध्ये सतत कोठे ना कोठे हिंसाचाराच्या आणि गोळीबाराच्या घटना घडताना दिसतात लहान मुले सुद्धा शाळेमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये गोळीबार करून आपल्या सहकाऱ्यांना ठार करण्याच्या घटना घडल्या आहेत अमेरिकेतील हे गन कल्चर दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनत चालला असून अमेरिकन प्रशासन याबाबत कडक कायदा करण्याचा विचारात आहे.