पिंपरी | चिखली येथे मोटर गॅरेजला आग

पिंपरी, (वार्ताहर) – चिखली पाटीलनगर भागातील व्यंकटेश मोटर गॅरेजला मंगळवारी मध्यरात्री (दि. 7) 12 वाजून 28 मिनिटाला आग लागल्याची माहिती तळवडे अग्निशामक विभागाला मिळाली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी जात आग आटोक्यात आणली.

व्यंकटेश मोटर गॅरेजचे मालक लिंगप्पा रामराव यंपाळे यांनी चिखली येथील सोमनाथ मोरे यांच्या जागेत गॅरेज सुरू केले होते. या गॅरेजमध्येच यंपाळे रात्री झोपले होते. अचानक गॅरेजमध्ये आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अग्निशामक विभागाला फोन करून माहिती दिली.

मिळालेल्या माहितीच्या अधारे तळवडे येथील अग्निशाम बंब त्वरित घटनास्थळी दाखल झाला. त्यांच्या मदतीसाठी चिखली प्राधिकरण, भोसरी उपकेंद्र तसेच मुख्य अग्निशामक केंद्र पिंपरी येथील एकूण पाच फायर टेन्डर गाडीच्या सहाय्याने आग विझविण्यात आली.

या आगीमध्ये गॅरेजमधील पाच चारचाकी वाहने तसेच भंगार साहित्य जळून खाक झाले. जळालेल्या वाहनांमध्ये तीन ट्रक, एक पिकअप व्हॅन, एक टॅम्पो असे एकूण पाच वाहने जळाली. ही आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे सुनील फरांदे, दिनेश इंगळकर, शाम खुडे, विशाल खोत, हितेश पाटील, सारंग मंगरुळकर, संपत गौड, विशाल फडतरे, संतोष सरोटे, विकास बोंगाळे इतर कर्मचारी यांनी आग आटोक्यात आणली.