पिंपरी | मराठा आरक्षणासाठी खालापूरात आंदोलन

खालापूर, (वार्ताहर) – राज्य सरकारने सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मराठा समाजाने रास्ता राेकाे आंदाेलनाची हाक देताच सकल मराठा समाज बांधवांनी मुंबई – पुणे जुन्या महामार्गावर खालापूर फाट्यावर काही मिनिटे ठिय्या धरत रास्ता रोको आंदोलन केले.

यादरम्यान वाहनांची रांग लागली होती तर खालापूर फाटा ते तहसिल कार्यालयापर्यत मोर्चा काढण्यात आला होता. तहसिलदार आयुब तांबोली यांना निवेदन दिल्यावर आंदोलन शांततेत थांबविण्यात आले.

खालापूर फाटा ते तहसिल कार्यालयापर्यत मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर तहसिलदार आयुब तांबोली, नायब तहसिलदार सुधाकर राठोड यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी राज्य समन्वयक डॉ. सुनील पाटील, उत्तम भोईर,एकनाथ पिंगळे, जे. पी. पाटील,सुर्यकांत देशमुख, निवृत्ती पिंगळे, किरण हाडप, संकेत हाडप, राजेश पाटील, नरेश पाटील, भरत पाटील, धनश्री दिवाणे, कविता पाटील, निता पाटील आदी उपस्थित होते. ५७ लाख कुणबी असल्याच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यांना तातडीने प्रमाणपत्र द्यावे, यासाठीच आंदोलन असून रविवारी (दि. ३ ) मुंबई -एक्सप्रेस वे खालापूर टोल नाक्यावर रास्ता रोको करणार असल्याचा इशारा सुनील पाटील यांनी दिला.