खासदार अमोल कोल्हेंची वाडेबोल्हाई प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

वाघोली( प्रतिनिधी) : शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वाडेबोल्हाई प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली आहे.यावेळी कोल्हे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी लसीकरण व कोरोना परिस्थिती चा आढावा घेतला.

खासदार कोल्हे यांना ग्रामपंचायत वाडेबोल्हाई च्या वतीने सरपंच दिपक गावडे यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यामध्ये वाडे बोल्हाई येथील सिधदाचलम येथे कोवीड सेंटर मंजूर असून त्याठिकाणी मेडिकल स्टाफ व इतर सुविधा ज्या जिल्हा परिषद कडून मिळणार आहेत त्या बाबतीत अजूनही निर्णय झालेला नाही, याबाबत लक्ष देण्याची विनंती ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली.

याप्रसंगी अप्पर तहसीलदार विजयकुमार चौबे, हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष दिलीप नाना वाल्हेकर, वाघोली चे माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, बाळासाहेब सातव पाटील,अमित बाबा कांचन, माजी उपसरपंच राजेश वारघडे ,संतोष गावडे, माजी उपसरपंच सुरेखा भोरडे ,सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव भोरडे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. सचिन सूर्यवंशी , डाॅ. करुणा जगताप साळवे , प्राथमिक आरोग्य केंद्र वाडे बोल्हाई येथील सर्व आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.