MP Assembly Elections : पंतप्रधान मोदी उज्जैनमधून प्रचाराचा नारळ फोडणार; घेणार जाहीर सभा

MP Assembly Elections 2023:देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका आता टप्याटप्याने पार पडणार आहेत. त्यातच प्रत्येक पक्ष आपला प्रचार जोरात करताना दिसून येत आहे.दरम्यान, मध्य प्रदेशातही निवडणूक प्रचार जोर धरत असून याठिकाणी भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यातच  उज्जैनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशाल जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी येणार आहेत. त्यासंदर्भात जागाही निवडण्यात आली आहे. पीएमओ कार्यालयाकडून अद्याप तारीख निश्चित झालेली नाही. मात्र, नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या पंतप्रधानांच्या या सर्वसाधारण सभेची तयारी आतापासूनच सुरू झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी उज्जैनमध्ये जाहीर सभा घेत आहेत. 2013 च्या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्जैन शहरातील नानाखेडा स्टेडियमवरून जाहीर सभेला संबोधित केले होते. यावेळी पुन्हा त्यांची सर्वसाधारण सभा उज्जैन शहरातच होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) शहराध्यक्ष विवेक जोशी यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उज्जैनमध्ये मोठी जाहीर सभा होणार आहे. यासाठी दोन ठिकाणांची निवड करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पुढे विवेक जोशी म्हणाले की, नानाखेडा स्टेडियमशिवाय कार्तिक फेअर ग्राऊंडचाही निवडलेल्या ठिकाणी समावेश आहे. मात्र, नानाखेडा स्टेडियम अधिक योग्य मानले जात आहे. तसेच पंतप्रधान मोदींच्या सर्वसाधारण सभेची तारीख अद्याप ठरलेली नाही. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली असल्याचे जोशी यांनी यावेळी सांगितले.   तर दुसरीकडे भाजपकडून कार्नाय्त येत असलेल्या प्रचाराला काँग्रेसने उत्तर दिले आहे. भाजपने काहीही केले तरी सत्ता परिवर्तन निश्चित आहे, असे काँग्रेसचे आमदार महेश परमार यांचे म्हणणे आहे.

महेश परमार म्हणाले की, पंतप्रधानांच्या भेटीनेही फारसा फरक पडणार नाही. 2013 मध्ये उज्जैनमध्ये पंतप्रधान मोदींनी सर्वसाधारण सभेला संबोधित केले होते. उज्जैन विभागातील या सर्वसाधारण सभेची अशी जादू होती की संपूर्ण विभागातील २९ जागांपैकी केवळ एक जागा काँग्रेसच्या खात्यात गेली. सुवासरा विधानसभा जागा काँग्रेसला तत्कालीन उमेदवार हरदीप सिंग डांग यांनी विजयाची नोंद करून दिली होती. यावेळी भाजपला पंतप्रधानांच्या सभेतून पुन्हा जादू करण्याची आशा आहे.