मुलायमसिंह यादव रुग्णालयात दाखल

गुरुग्राम – समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांना बुधवारी दुपारी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत रुग्णालयाकडून अद्याप कोणतेही माहिती देण्यात आली नाही.

मुलायमसिंह यांना काही वर्षांपासून आरोग्याशी संबंधित अनेक समस्या भेडसावत आहेत. गेल्यावर्षी त्यांना मूत्रपिंडाच्या विकारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच ऑक्‍टोबरमध्ये मुलायम यांना करोनाचा देखील संसर्ग झाला होता. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती.

दरम्यान, मुलायमसिंह राजकीयदृष्ट्या सध्या सक्रिय नाहीत. मात्र सपा नेते त्यांची भेट घेत राहतात. मुलायम स्वत: अनेकदा सपा कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांशी बोलत असतात.