किरण खेर यांना झालेला मल्टिपल मायलोमा कॅन्सर म्हणजे काय?

काही महिन्यांपूर्वी किरण खेर यांना टेस्ट केल्यानंतर मल्टिपल मायलोमा कॅन्सर असल्याचे निदान झाले. यानंतर त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू झाले. मल्टिपल मायलोमा कॅन्सर हा एक रक्ताच्या कँसरचा प्रकार आहे. रक्ताचा कॅन्सर हा मुख्यत: प्लाझ्मा सेल नावाच्या पांढऱ्या पेशींचा आजार आहे.

मल्टिपल मायलोमा झाल्याचा त्याचा परिणाम रक्त, हाडं आणि किडनीवर होतो. मल्टिपल मायलोमा हा रक्ताच्या प्लाझ्मा सेल नावाच्या पांढऱ्या पेशींमध्ये सुरू होतो. हाडांच्या मज्जात बनवलेल्या प्लाझ्मा सेल रक्तपेशींचा हा एक प्रकार आहे. मल्टिपल मायलोमाचे निदान करण्यासाठी संबंधित चाचण्या करणं आवश्यक आहे. याआजाराच्या उपचारासाठी किमो-इम्यूनो थेरपी, स्टेम सेल ट्रांसप्लांट, अशी उपचार पद्धती वापरली जाते.

ब्लड कॅन्सरचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मल्टिपल मायलोमा. मल्टिपल मायलोमामुळे अस्थिमज्जांमध्ये प्लाझ्मा पेशींचा संचय होतो आणि रक्त पेशींच्या उत्पादनांवर परिणाम होतो असंही डॉ. प्रथमेश कुलकर्णी सांगात. वय वर्ष 65 पेक्षा कमी असल्यास ऑटोलॉगस ट्रांसप्लांटचाही पर्याय असतो. या उपचारामुळे मल्टिपल मायलोमा बराच काळ नियंत्रणात राहू शकतो.

मल्टिपल मायलोमाची लक्षणे कोणती?
सतत हाडांचे दुखणे, हाडं कमकुवत होणे आणि
अगदी सामान्य दुखापतीतही फ्रॅक्चर होणे
अॅनिमिया
सतत संसर्ग होणे.
निदान आणि उपचार

Leave a Comment