कौतुकास्पद! नाल्यातून वाहत जाणाऱ्या बाळाचे मुंबई पोलिसांनी वाचवले प्राण; मांजराने बजावली महत्वाची भूमिका

मुंबई – नवजात बाळ नाल्यातून वाहत जात असताना मुंबई पोलिसांनी या बाळाला वाचविले आहे. या बाळाला वाचविण्यासाठी मांजरीने महत्वाची भूमिका निभावली आहे. शहरातील घाटकोपर परिसरातील पंतनगर परिसरात ही घटना घडली आहे. मुंबई पोलिसांच्या या कामगिरीमुळे त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होताना दिसून येत आहे.
https://twitter.com/MumbaiPolice/status/1460262072504049666

पंतनगर येथिल नाल्यातून एक नवजात बाळ वाहत असल्याचे सर्वप्रथम मांजराला दिसून आले. त्यामुळे या मांजराने ओरडण्यास सुरुवात केली. हे मांजर जोरजोरात का ओरडत आहे हे बघण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली असता त्यांना नाल्यात बालक वाहून जात असल्याचे लक्षात आले. मांजराने अलर्ट केल्यामुळे नागरिकांना बाळ वाहत जाताना दिसून आले.

या नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता पोलिसांनी माहिती दिली. ही माहिती मिळताच मुंबई पोलिसांना तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व त्या बालकास सुखरुर वाचविले व रुग्णालयात दाखल केले.

घडलेल्या या प्रकाराची मुंबई पोलिसांनी ट्वीट करून माहिती दिली. मुंबई पोलिसांना आपल्या ट्वीट मध्ये त्या नवजात अर्भकाला कपड्यामध्ये गुंडाळण्यात आले होते. त्याला बघून मांजरीने आवाज करायला सुरुवात केली.यानंतर लोकांचे लक्ष त्या नवजात अर्भकाकडे गेले. त्याला बघताच लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचे निर्भया पथक तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले. पोलीस पथकाने त्या बाळाला नाल्यातून बाहेर काढले आणि राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, आता नवजात अर्भक धोक्याबाहेर असून प्रकृती उत्तम आहे.