मुंबईत जेजे रुग्णालयाजवळच्या इमारतीचा भाग कोसळला

मुंबईः मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यातच आता मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयाजवळ नंद विलास इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे.

इमारत जुनी असल्याने रिकामी करण्यात आली होती. परंतु, आत एक मुलगा अडकल्याची माहिती समोर येत आहे. या इमारतीच्या गच्चीचा काही भाग कोसळला. जे. जे. रुग्णालयाजवळ मौलाना शौकत अली रोडवर जवळपास आज पहाटे 4 वाजताच्या दरम्यान नंद विलास इमारतीचा काही भाग निखळला. या दुर्घटनेत एक जण जखमी आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाची गाडी दाखल झाली असून, बचावकार्य सुरू आहे.

Leave a Comment